---Advertisement---

“आम्ही अधिकारी झालो” नक्कीच प्रेरणादायी ठरेल – राज्यपाल

By
On:
Follow Us

“आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक युवक, युवती यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल तसेच सर्व सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध विभागांचे कामकाज कसे चालते, हे ही या पुस्तकाद्वारे कळेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री रमेश बैस यांनी “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाचे लोकार्पण प्रसंगी व्यक्त केला.

राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाचे मुंबईतील राजभवन येथे नुकतेच लोकार्पण करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पुस्तकाचे लेखक – संपादक श्री देवेंद्र भुजबळ, न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन च्या सौ अलका भुजबळ, न्युज स्टोरी टुडे टीम चे सदस्य श्री अतुल सोनवणे, एम टेक हे उपस्थित होते.

पुस्तकाचे लोकार्पण झाल्यानंतर राज्यपालांनी पुस्तकाविषयी अतिशय औछ्युक्याने माहिती घेतली. ही माहिती देताना श्री देवेंद्र भुजबळ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अधिकारी झालेल्या आणि अधिकारी झाल्यानंतर लोकाभिमुख आणि कार्यक्षमपणे सेवा बजाविलेल्या व बजावित असलेल्या विविध अधिकाऱ्यांची माहिती दिली.

सर्व माहिती ऐकल्यावर राज्यपालांनी हे पुस्तक युवक, युवती यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल तसेच सर्व सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध विभागांचे कामकाज कसे चालते, हे ही कळेल, असा विश्वास व्यक्त केला.

 

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Related News

Leave a Comment