---Advertisement---

जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये “आम्ही अधिकारी झालो ” प्रकाशित

By
On:
Follow Us

एरवी पुस्तक प्रकाशनाचे  कार्यक्रम एखाद्या हॉल मध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमा दरम्यान होतात,हे आपण नेहमीच
वाचत आला असाल.पण नुकतेच “आम्ही अधिकारी झालो ” या पुस्तकाचे प्रकाशन जपानच्या जगप्रसिध्द बुलेट ट्रेनमध्ये झाले !असे या बुलेट ट्रेनमध्ये प्रकाशन होणारे हे बहुधा जगातील पहिलेच पुस्तक असावे.

या पुस्तकाचे प्रकाशन,पुस्तकाचे लेखक – संपादक श्री देवेंद्र भुजबळ,एम टी एन एल च्या निवृत्त उप व्यवस्थापक तथा कवयित्री सौ पौर्णिमा शेंडे,नागरिक प्रतिनिधी श्री जसविंदर सिंग,युवा प्रतिनिधी श्री शिवम खन्ना,टूर गाईड कुमारी लू विन आणि पुस्तकाचे प्रकाशन करणाऱ्या न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन च्या प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना श्री भुजबळ म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या आणि पुढे कार्यक्षम, लोकाभिमुख सेवा बजावित असलेल्या ५१ अधिकाऱ्यांच्या यश कथा या पुस्तकात आहेत.महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस यांना नुकतेच हे पुस्तक भेट दिले असता त्यांनी,हे पुस्तक युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल,असे कौतुक केल्याचे सांगून प्रकाशनापूर्वीच पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली अशीही माहिती श्री भुजबळ यांनी दिली.

नागरिक प्रतिनिधी म्हणून बोलताना श्री गुरविंदर सिंग यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की,सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना नागरिकांच्या करातून पगार मिळतो याचे भान ठेवून त्यांनी स्वच्छ, कार्यक्षम, लोकाभिमुख सेवा बजावून सौजण्यपूर्ण वागणूक दिली पाहिजे.

युवा प्रतिनिधी म्हणून बोलताना श्री शिवम खन्ना याने सांगितले की,जशा पालकांच्या मुलांकडून अपेक्षा असतात तशाच मुलांच्या पालकांकडून काय अपेक्षा आहेत? हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.विशेषत: करिअरच्या बाबतीत मुलांची आवड निवड,कल ओळखून त्यांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे.आजचा युवक हा “आजचा युवक” आहे, तो २५ वर्षांपूर्वीच्या युवक नसून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलेला आहे,हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.

सौ पौर्णिमा शेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, मी एम टी एन एल मध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरीस लागले.पुढे लग्न होऊन  दोन मुलं झाल्यावर सासरच्या मंडळींनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी चांगली केल्याने अधिकारी होऊ शकले.

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Related News

Leave a Comment