मिरारोड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी समाजसेवक सुरेश रामभाऊ कोरडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. सुरेश कोरडे यांनी तळागाळातील गरजू लोकांना नेहमीच मदत केली आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यामूळे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यांना सामाजिक कामाची आवड असल्याने त्यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष रविभाऊ वैद्य आदेशाने राष्ट्रीय महासचिव माणिक निमसे यांनी केली . कोरडे यांच्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी सुरेश रामभाऊ कोरडे यांची नियुक्ती
For Feedback - feedback@example.com