भारताच्या इतिहासामध्ये डोकावत असताना आपणास प्राचीन काळातील समाज व्यवस्था अभ्यासायला मिळते ज्यामध्ये साधारण इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात बौद्ध लेण्यांच्या निर्मितीला सुरवात झालेली आपणास पाहायला मिळते . लेणी निर्माण का झाली ? लेण्यांची निर्माती कोणी केली ? लेण्यांची निर्मिती कोणत्या काळात झाली ? हि लेणी कुणासाठी बांधण्यात आली? लेणीवर कोणत्या धर्माची लोक रहात होते ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लेण्यांच्या इतिहासातुन आपणास अभ्यासायला मिळते.
साधारण इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात लेणी बांधण्यास सुरवात झाली. परंतु लेण्यांच्या जन्माची कथा मात्र साधारणपणे नैसर्गिक गुहांच्या काळात घेवून जाते. निसर्गनिर्मित गुहांचा वापर त्यावेळी आदिमानवा कडून झाला. आदिमानवाने या नैसर्गिक गुहांचा वापर करून प्रगती करण्यास सुरू केली आणि पुढे मानव विकासाचे टप्पे पूर्ण करत पुढेआला. भारतात प्रामुख्याने पाहिले तर लेण्यांची संख्या हि 2000 पेक्षा जास्त आहे. त्या पैकी ८५ टक्के लेण्या ह्या महाराष्ट्र जिल्ह्यात आपणास पाहायला मिळतात. दक्खन चे पठार हे ज्वालामुखी दगडापासून निर्माण झालेल आहे. पृथ्विच्या भूगर्भातुन निघालेल्या ज्वालामुखिच्या दगडाला बेसॉल्ट दगड म्हणतात. हा अग्निजन्य खडक महाराष्ट्रात लयन स्थापत्य निर्माण करण्यास कारणीभुत ठरला आहे. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकाल प्रथमतः मानवनिर्मित लयन स्थापत्य उदयास आले. चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कालखंडात त्यांनी खलतीक डोंगरावर अजिवकांसाठी लेण्या निर्माण केल्या अश्या आशयाचा लेख त्यांनी लेण्यात कोरून ठेवला आहे. या लेण्या प्रथम ग्रेनाईड च्या दगडात कोरण्यात आल्या. ग्रेनाईडचा दगड हा अतिशय कठीण असतो यामध्ये लेणी कोरणे हे कठीण काम असते परंतु सम्राट अशोक यांच्या इच्छाशक्ति मुळे आज ग्रेनाईडच्या दगडात ही आपणास लेणी कोरलेली पहायला मिळतात
बेसॉल्ट दगडाने महाराष्ट्र घडला आणि लेणी निर्मितीस एक वाट मोकळी झाली. महाराष्ट्रात सर्वात जास्त लेण्या आढळून येतात त्यामुळे महाराष्ट्राच्या स्थापत्य परंपरेचा अभ्यास करणे काळाची गरज आहे. या ठिकाणी असलेली संस्कृती अभ्यासणे अतिशय आवश्यक आहे. त्याच बरोबर भारताल माहिती असलेल्या लेण्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त लेणी आहेत आणि अजून अभ्यासु संशोधकांच्या शोधामुळे लेण्यांच्या संखेत भर पडताना आपणास दिसते. लेण्याच्या निर्मितीसाठी विशिष्ट भुरचना आवश्यक असते , त्याच बरोबर हवामान, तेथील समाजाचे अर्थव्यवस्था आणि समाजातील लोकाचा मनुष्य स्वभाव हा लेणी निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. प्राचीन काळात लेणी निर्माण होण्याचे प्रमुख कारण होते , भिक्खुसंघ या भिक्खू संघाला वर्षाकाळ म्हणजेच पावसाच्या दिवसांमध्ये चारीका करण्यास पूर्णपणे बंदी होती. त्याचे कारणही तसेच आहे. भिक्खू संघाला या काळात निर्माण होणाऱ्या नैसर्गिक अडथळे आणि अडचणीपांसून सुरक्षित राहण्यासाठी होती. वर्षाकाळात मोठ्या प्रमाणात नाद्यांना येणारे महापूर, वादळाची परिस्थिती आणि इतर नैसर्गिक अडचाणि यांमुळे कोणत्याही भिक्खू संघाला या काळात जीवीत हाणी वा इतर कोणत्या हिं हाणीला सामोरे जाऊ नये म्हणुन वर्षाकाळात भगवान बुध्दाने भिक्खु संघाला चारीका करण्यास बंदी घालण्यात आणली होती. या काळात भिक्खू संघ हा विहारात वास्तव्य करत असे. हि विहारे दगड, चुना, माती, विटा, लाकुड असे अनेक प्रकारच्या साहित्याने निर्माण केली जात असून हया वस्तू इतर ठिकाणाहून आणून सपाट भूभागावर विहारांची निर्मीती केली जात असे परंतु हे स्थापत्य ठरावीक काळानंतर पुन्हा दुरुस्त करावे लागत असे, चक्रवर्ती सम्राट अशोका यांच्या काळात सर्वात प्रथम लेणी स्थापत्य निर्माण झाले. सम्राट अशोक यांचा नातु दशरथ यांच्या कालखंडामध्ये बराबर येथील लेण्या आजीवकाना आणि बौध्द भिक्खुना देण्यात आल्या. महाराष्ट्रात एकाच पाषाणात लेणे कोरणे या साठी महाराष्ट्रातील पाषाण अतिशय उपयुक्त होते. या स्थापत्य प्रकारात बांधकामासाठी डोंगराचा दगड हे साहित्य वापरले जात असे. अनावश्यक दगड बाजुला करुण लेणे निर्माण केले जात होते लेण्यांना कातळशिल्य असेहि म्हणतात. या मध्ये लेणी कोरण्याची पध्दत ही वरुन खाली व बाहेरून आत अशा पध्दताने केलेली आपणास पाहायला मिळते.
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात भारतात पहिल्यांदा लेण्यांची निर्मिती करण्यास सुरवात झाली आणि पहिली लेणी बिहार राज्यातील गयेपासून जवळ असणाया जोहनाबाद मधील बराबर टेकडी वर ग्रेनाइडच्या दगडात पहिल्यांदा लेण्यांची निर्मिती करण्यात आली. ह्या लेण्यांची निर्मिती चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी केली म्हणूनच लेण्यांचा आद्य निर्माता तसेच भारताच्या इतिहासातील प्रगत स्थापत्यशास्त्राचा जनक म्हणूनच त्यांच्याकडे पाहीले जाते आणि एवढेच नाही तर याच बाराबर टेकडीवर त्यानि कोरलेला लेख हा भारतातील पहिला शीलालेख आहे. अशोकाचा इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून सुरू झालेला हा लेणी निर्मितीचा प्रवास जवळपास इसवी सन 12 व्या शतकापर्यंत आपणास पाहायला मिळतो. जवळपास १५०० वर्षे निरंतर मागणी तसा पुरवठा या तत्वावर लेण्याची निर्मिती होत होती आणि म्हणूनच भारताला इतर हेरिटेज मध्ये सर्वात जास्त लेण्याचे हेरीटेज आहे. भारतात स्थापत्यकलेचा सुंदर असा नमुना म्हणून या देशात लेणी स्थापत्य हे उदयास आले आणि प्रसिद्ध झाले. चक्रवर्ती सम्राट अशोकाने सुरू केलेल्या लेणी निर्मितीला खऱ्याअर्थाने जर का कोणी उंची वर नेले असेल तर तो महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश बौद्ध धम्माचे जाणते उपासक सातवाहन राजवंश महाराष्ट्राच्या सातवाहन राजवंश यांच्या संबंधी महाराष्ट्राचे बौध्द सम्राट सातवाहन राज वंश या विषयात सविस्तर माहिती दिलेली आहे. सम्राट अशोकाने लेणि निर्मिती सुरु केल्यावर महाराष्ट्रात पहिली लेण्याची निर्मिती सुरु झाली ती मुबई उपनगरांच्या बाजूला असणारे पश्चिम रेल्वेचे- महत्वाचे रेल्वे स्थानक विरार या ठिकाणी ऐतिहासीक प्राचीन बुद्ध लेणी जीवदानी म्हणून निर्माण करण्यात आली . आज जीवदानी बुध्द लेणी वर जीवदानी देवी च्या नावाने मोठे मंदिर निर्माण करण्यात आले आहे. भारताच्या पूर्व व दक्षिण उत्तरे पेक्षा भारताच्या पश्चिम भागात लेण्यांचे जास्त निर्माण कार्य झालेले असणास पाहायला मिळते. खास करुण महाराष्ट्रात लेण्यांची निर्मीती खूप मोठ्या प्रमाणावर झाली. महाराष्ट्रात लेणी निर्माण होण्याचे कारण ठरले महाराष्ट्रात असणाया काळ्या पाषाणाचे पर्वत रांगा. या कातळाला बेसाल्ट रॉक असे हि म्हणतात- हा कातळ लाव्हा रसापासुन तयार झाल्याने याता Deccan Trap देखील म्हणतात त्यामुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त व खुप मोठ्या प्रमाणावर लेणी निर्मिती झाली. कारण काही काळात झीज होउन नष्ट होणासा लाकडी व दगड मातीच्या वास्तु पेक्षा एकाच पाषाणात निर्माण केलेल हे लेणे सर्वोत्तम ठरले.
महाराष्ट्रात सर्वात जास्त लेणी असण्याचे कारण म्हणजे इथे असणाऱ्या सहयाद्रीच्या पर्वत रांगा आणि घाट माथ्याचा रस्ता व मोठे व्यापारी केंद्र भारतात असणाऱ्या लेण्यांचे भौगोलीक दृष्टीने वर्गीकर केले असता सम्राट अशोक यांच्या काळात आणि समकालीन काही लेण्यांचे अवशेष आपणास पाहायला मीळतात. बिहार ओरीसा, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक अश्या विविध भागात असंख्य लेण्यांचे समूह आपणास पाहायला मिळतात महाराष्ट्रातील लेण्यांचे भौगोलिक दृष्टीने वर्गीकरण केले असताना लेण्या ह्या प्राचिन व्यापारी मार्गावर आपणास आढळतात सोपारा हे प्राचिन व्यापारी बदर असून येथुन निघालेला व्यापाराचा राजमार्ग नाला सोपारा वरून विरार मार्गे डहाणू कडून गुजरात येथील भडोचकडे जातो तर एक मार्ग वसई नायगाव मार्गे दहिसर कडुन कान्हेरी लेणे व तेथुन कांदिवली , मागठाणे , पडण हिल तसेच पुढे तो मालाड कडून जोगेश्वरीकडे येवुन कोंडविते लेणीकडे येतो तेथुन पून्हा हा मार्ग एक ठाणे बंदराकडे तर एक मलबार कडून भेट घारापुरी या मार्गाकडे जातो. धारापूरीकडून पनवेल खाडी मार्गे डोगा दूंगी बंदरातुन पुढे कोकणात निघतो व कोकणातून हा मार्ग पुन्हा जुन्नर कडे वळतो आणि जुन्नरहुन पैठण कडे जातो. ठाणे कडुन आलेला हा व्यापारी मार्ग कल्याण बंदरात येतो तेथून व्यापाराचे तिन राजमार्ग निघतात थळघाट, बोरघाट आणि नाणे घाट . या तीन व्यापारी मार्गावर असणाऱ्या मार्गातुन पुढे अनेक मार्ग निघतात आणि संपूर्ण महाराष्ट्र या व्यापाऱ्यांच्या रस्त्याचे मोठे जाळे निर्माण झालेले आपणास पाहायला मिळते. महाराष्ट्रात लेणी बांधकाम हे सातवाहन सम्राट यांनी सुरू केल. सातवाहन हा महाराष्ट्राचा ज्ञात राजवंश असून सिरी सातवाहन या सम्राटाने लेणी बांधकामाला सुरवात केली . त्याच्या नंतर सम्राट अशोकाच्या नंतर सिमुक सालवाहन या सम्राटाने स्वतःला स्वतंत्र राजा घोषित केल्यावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लेणी कोरण्यास सुखात झाली इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात महाराष्ट्रात पुणे जिल्हयातील मावळ प्रांतात भाजे नावाची लेणी कोरण्यास सुरवात झाली याच काळात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पितळखोरा बुद्ध लेणी तर रायगड जिल्हयातील, कर्जत तालुक्यातील कोंढाने लेणी आणि मुंबई उपनगर बोरीवली येथील संजय गांधी उद्यानात असणारी ऐतिहासीक कान्हेरी लेणी यांचे काम सुरू झाले होते व कान्हेरी लेणी हि मौर्य काळात कामाला सुरवात झालेली लेणी आहेत या काळानंतर महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी लेणीचे स्थापत्य निर्माण होवू लागले . गावोगावात लेणी निर्माण होवू लागली.
लेण्यांची निर्मिती का करण्यात आली ? हा सर्वात महत्वाचा प्रश्न प्रत्येक लेणी अभ्यासक व प्रत्येक माणसाला पडतोच तर त्याचे उत्तर सोप आहे. लेणी हि बौद्ध भिक्षुच्या राहण्यासाठी निर्माण केली गेली वर्षावासाच्या कालात भिक्खुना चारिका करण्यास बंदी असे नैसर्गिक अडचाणि पासून सुरक्षित राहण्यासाठी त्याना वर्षावासाच्या काळात चारिका बंद असे अश्यावेळी गावापासून जास्त दूर नाही व गावापासुन जास्त जवळ हि नाही अशा ठिकाणी लेणी निर्माण करण्यास सुरवात झाली आणि बघता बघता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपणास लेणी पाहायला मिळतात. मुंबई घारापुरी व कोकण प्रांतात एकुण 600 पेक्षा जास्त लेणी आहेत जुन्नर मध्ये सुमारे 207 पेक्षा हि जास्त लेणी आहेत. अजुन नवनविन लेण्यांची भर या लेणी गटामध्ये पडत आहे पुणे मावळ या भागात 180 पेक्षा जास्त लेणी आहेत नाशिक औरंगाबाद परिसर पाहता या ठिकाणी 400 लेणी आहेत. कराड वाई सातारा या ठिकाणी विभिन्न गटात 150 पेक्षा जास्त लेणी आहेत महाराष्ट्रात लहान मोठ्या दुर्लक्षित प्रसिध्द अशा 1500 पेक्षा जास्त लेणी हया केवळ महाराष्ट्रात आढळतात अनेक छोट्या छोट्या निवासी लेण्यांची गणना झाली तर महाराष्ट्रात जवळपास दोन हजारापेक्षाही जास्त लेणी सापडतील. हा जागतिक वारसा स्थळ पाहण्यास आपण एकदा नक्की जा . लेणी अभ्यास दौऱ्यासाठी आमची काही मदत लागली तर नक्की सांगा .. आमचा एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूह , महाराष्ट्र राज्य या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत .
संकलन : सयाजीराव नारायण कांबळे
धम्मलिपी शिक्षक
एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूह , महाराष्ट्र राज्य
9324560347