विधानसभा 145 मध्ये महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत
भाईंदर : मिरा भाईंदर शहरामध्ये माजी नगरसेवक अरुण बाबाजी कदम गेली 40 वर्ष सक्रिय राजकारण आणि समाजकारणामध्ये कार्यरत असून मिरा भाईंदर विधानसभा 145 मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. 1990 पासून राजकरणात काँग्रेस पक्षाचे भाईंदर युथ चे अध्यक्ष पदापासून राजकीय कारकीर्द सुरुवात केली. सर्वात प्रथम काँग्रेस भाईंदर युथ अध्यक्ष असताना नगरसेकपदाची निवडणुक जिंकून 1992 साली नगरपरिषद अध्यक्ष मान मिळाला. त्यानंतर सतत आपले राजकीय कारकीर्द सुरू ठेऊन समाजकार्य आजपर्यंत सुरू आहे. मागील काही दिवस कामाची गती कमी झाली असल्याचं प्रांजळपणे खंत व्यक्त करून आता 145 विधानसभेचे निवडणुक लढवून समाजकार्य जोमाने करणार असल्याची ग्वाही दिली.
मिरा भाईंदरच्या मागच्या आमदाराने विकासकामे न करता फक्त घोषणा केल्या असून शहरातील नागरिक विकासापासून वंचित आहेत. 15 वर्षाच्या कारकिर्दीत जे लोक विकास झाला असे म्हणतात पण तो विकास नसून भकास आहे. कारण त्या मूलभूत गोष्टी आहेत त्या शहराला आणि लोकांना हव्या असलेल्या शैक्षणिक व्यवस्था, आरोग्य सुविधा, पाणी सुविधा मिळू शकल्या नाहीत त्यामूळे निवडणुक लढवत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
कदम पुढे म्हणाले की, सर्व प्रांतातील, सर्व राज्यातील, सर्व जाती धर्माची लोक इथे राहतात प्रत्येकाची संस्कृती, खाद्य संस्कृती वेगवेगळ्या आहे आणि ती संस्कृती जपण्याचा प्रत्येकाला आपला अधिकार आहे. कोणी काय खावं आणि काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे जातिय राजकारण न करता मला जनसेवा करायची संधी जनतेने द्यावे असेही आवाहन केले. त्यामूळे मिरा भाईंदर विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.