---Advertisement---

मुंबईच्या एकजूट लेणी संवर्धक समूहाचा गोव्यात ३ दिवसीय लेणी अभ्यास दौरा संपन्न

By
On:
Follow Us

गोवा : एकजूट लेणी संवर्धक प्रचार प्रसारक समूह, महाराष्ट्र राज्य आयोजित ३ दिवसीय ” गोवा लेणी अभ्यास दौरा” साठी १ ते ३ नोव्हेंबर याकालावधीत गोव्यातील लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी मुंबईहून १३ जणांचा समूह गोव्यात दाखल झाला होता . या दौऱ्यात एकजूट लेणी चे प्रमुख सारिश (दादूस ) डोळस, ऍड खंडेश बगाटे, अभिजीत बनसोडे, संदीप पाटील, राकेश पवार, सचिन मर्चंडे , नितीन जाधव , बबन ओव्हाळ, अरविंद सावंत, सुरेश माने , स्वप्नील ओव्हाळ , शुभम डोळस, दयानंद जाधव आणि “लेणी संवाद”चे प्रफुल्ल पुरळकर उपस्थित होते . ह्या दौऱ्याचे नियोजन प्रफुल्ल पुरळकर व सारिश (दादूस ) डोळस यांनी केले होते तर मार्गदर्शक गोव्याचे राहुल तायडे हे होते .

ह्या दौऱ्यात या समूहाने ९ लेण्या – ऍडकोन , हरवळे , लामगाव खांडेपार, ईश्वरभट, मंगेशी, अक्वेम , रिवोना १ व २ , दत्त लेणी पहिल्या. त्यासोबतच त्यांनी मंदिरे, कातळशिल्प , समुद्र किनारे , पुरातत्व म्युझियम असे एकूण २६ प्रेक्षणीय / पुरातत्वीय स्थळे पाहिलीत. या दौऱ्यासाठी स्थानिक डॉ सुहास चांदेलकर , एस के चांदेलकर, अर्जुन जाधव, राहुल तायडे व प्रवीण गांगुर्डे यांनी विशेष सहकार्य केले. यांच्यामुळे हा दौरा यशस्वी झाला. लेण्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे या हेतूने यापूर्वीही एकजूट लेणी संवर्धक समूहाने , पुणे, जुन्नर , औरंगाबाद, सातारा, कोकण, कोल्हापूर, जयसिंगपूर, पंढरपूर येथे अशा प्रकारच्या लेणी अभ्यासाचे दौरे आयोजीत केले होते.

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment