महाराष्ट्रात राहून नरेंद्र मेहताला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा तिरस्कार आहे का ? मराठी एकीकरण समितीचा आक्षेप
भाईंदर : विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी उमेदवार आपला प्रचार विविध मार्गाने जोरात सुरू केला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदासंघात मोठ्याप्रमाणत बॅनरबाजी केली गेली आहे. अशाच प्रकारच्या बॅनरवरून महायुतीचे विधानसभा 145 महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा एक प्रताप समोर आला आहे. त्यांनी मतदासंघात मोठ्याप्रमाणत अनेक ठिकाणी लावलेल्या बॅनरवर स्थानिक नेते आणि धर्मवीर आनंद दिघे, हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान, भारतरत्न अटळ बिहारी वाजपेयी एकसमान लावले आहेत. म्हणजेच बॅनरवर महापुरुषांची बरोबरी स्थानिक नेत्यांशी केल्याचे दिसून येते. त्यामूळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. बॅनर लावताना उमेदवार नरेंद्र मेहता यांनी भान ठेवून महापुरुषांना आदर स्थान देऊन बॅनरवर फोटो लावणे आवश्यक असताना त्यांचे वरीष्ठ नेत्यांपासून ते स्थानिक नेते अशोक शर्मा, रवि व्यास, राजू भोईर, देवेंद्र शेळेकर यांच्या बरोबरीने एकसमान फोटो आदरणीय महापुरुषांचे आहेत.
महाराष्ट्रात राहून नरेंद्र मेहताला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा तिरस्कार आहे का ? कै. बाळासाहेबांचा फोटो इतका लहान का? मराठी राज्यात राहून बाळासाहेबांचा फोटो लहान? नक्की यांना काय सिद्ध करायचे आहे? असा संतप्त प्रश्न मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांना विचारला आहे. तसेच लावण्यात आलेले सर्व बॅनर ही हिंदी भाषेत असून मराठी मतदार तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
त्यामूळे बॅनरवरून स्थानिक कार्यकर्ते यांनी आक्षेप घेतला असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देत ती अक्षपार्य बॅनर तात्काळ हटवण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.