भाईंदर (प्रतिनिधी): क्रांतीफुले च्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे, साप्ताहिक मिशन जनकल्याण चे कार्यकारी संपादक कवी व समीक्षक प्रा. उत्तम भगत यांना महात्मा कबीर समता परिषदचा महाराष्ट्रभूषण व जीवनगौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे, त्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. महात्मा कबीर समता परिषदचे डॉ. मुकुंदराज पाटील, संस्थापक अध्यक्ष यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रा. उत्तम भीमराव भगत हे अभिनव महाविद्यालय,भाईंदर येथे गेल्या 18 वर्षापासून इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक , तसेच मास मीडिया विभागप्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत. विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व तत्सम शिबिरांतुन 100 च्या वर व्याख्याने देऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचे शैक्षणिक विचार या विषयावर आजवर विविध दैनिकातुन व विविध नियतकालिकांतुन वैचारिक साहित्य प्रकाशित झाले आहे. शैक्षणिक विषयावर झालेल्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेमीनार व कार्यशाळेेत शोधनिबंध सादर करुन त्यात सक्रीय सहभाग घेतला आहे. आत्तापर्यंत जवळपास 25 पुस्तकावर समीक्षालेखन केले आहे.”कवी जेंव्हा बोलतो…” या आत्तापर्यंत झालेल्या 76 काव्य वाचनाच्या कार्यक्रमातुन समाजामध्ये साहित्य मूल्ये रुजवन्याचे काम केले आहे. देश हा सारा गहिवरला… हे गाणे भीमबाणा यू ट्यूब चॅनल वर 5 डिसेंबर 2023 रोजी रिलिज झाले. “क्रातिफुले” या समाज परिवर्तनपर कविता सादरीकरण कार्यक्रमातून प्रबोधन सुरू आहे. त्याचप्रमाणे सामाजिक दायित्व समजून आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांचे संगोपन केले आहे व करतही आहे.
सामाजिक आणि शैक्षणिक कामाबद्दल 2010 साली नवी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर आतापर्यंत विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.