---Advertisement---

ठाणे येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

By
On:
Follow Us

ठाणे : ठाणे येथे युध्द विधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माजी सैनिक व सेवारत सैनिकांच्या मुलांसाठी सर्वसोयींनी युक्त असे वसतीगृह, ज्ञान साधना कॉलेज मागे, धर्मवीर नगर, नौपाडा, ठाणे (पश्चिम) या ठिकाणी कार्यरत आहे.

अ) सैनिकी मुलांचे वसतीगृह, ठाणे  मो. 9769664830, 9246624105, 9819786350

या वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण तसेच औद्योगिक प्रशिक्षण आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या युध्द विधवा पाल्य, माजी सैनिक विधवा पाल्य, युध्दात जखमी झालेले माजी सैनिकांचे पाल्य, माजी सैनिक पाल्य व सेवारत सैनिक पाल्य यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. तसेच जागा शिल्लक राहत असल्यास नागरी पाल्यांना प्रवेश देण्यात येईल. प्रवेश पुस्तिका विक्री दि. ०२ जुलै २०२४ पासून सैनिकी मुलांचे वसतीगृह, ठाणे येथे सुरु करण्यात आली आहे.

प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी वसतीगृह अधीक्षक यांच्याशी समक्ष संपर्क साधून वसतीगृह प्रवेश पुस्तिका प्राप्त करुन घ्याव्यात. रविवार, दि.२८ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी वसतीगृह प्रवेश प्रक्रिया मंगळवार, दि.३०जुलै २०२४ रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, ठाणे येथे राबविण्यात येईल, यावेळी अर्ज सादर केलेले विद्यार्थी/पालक यांनी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे.

दरमहा आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे :-

सेवारत सैनिक अधिकारी दरमहा :- निवास– 2 हजार, भोजन – 2 हजार 500/- असे एकूण शुल्क 4 हजार 500/-.

सेवारत सैनिक जेसीओ दरमहा :- निवास– 1 हजार, भोजन – 2 हजार 500/- असे एकूण शुल्क 3 हजार 500/-.

सेवारत सैनिक शिपाई/एनसीओ दरमहा :-निवास– 800, भोजन- 2 हजार 500/-असे एकूण शुल्क 3 हजार 300/-.

माजी सैनिक अधिकारी व ऑन.कमिशन्ड अधिकारी – निवास– 1 हजार, भोजन- 2 हजार 500/-असे एकूण शुल्क

3 हजार 500/-.

माजी सैनिक जेसीओ दरमहा :- निवास– 800, भोजन – 2 हजार 500/- असे एकूण शुल्क 3 हजार 300/-.

माजी सैनिक शिपाई/एनसीओ दरमहा :- निवास– 500, भोजन – 2 हजार 500/- असे एकूण शुल्क 3 हजार.

बाह्य राज्य मा. से./नागरी दरमहा :- निवास– 2 हजार, भोजन – 2 हजार 500/- असे एकूण शुल्क 4 हजार 500/-.

या सूवर्णसंधीचा जास्तीत-जास्त माजी सैनिक पाल्यांनी तसेच इतरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ठाणे मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी केले आहे. तसेच युध्द विधवा व इतर माजी सैनिक विधवांच्या सर्व पाल्यांना तसेच अनाथ पाल्यांना भोजन, निवास व सेवा शुल्क मोफत आहे, सैनिकांचे पाल्य भरुन झाल्यावर जागा रिक्त असल्यास नागरी पाल्यांचा तिसऱ्या/अंतिम फेरीत विचार करण्यात येईल, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर श्री. जाधव (नि.) यांनी कळविले आहे.

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment