भाईंदर: काँग्रेसची परंपरा राहिलेली आहे की, ज्या काँग्रेसने संविधान बनवलं त्याच काँग्रेसने संविधान जोपासलं आहे. राज्यघटना तयार करण्यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्या कमिटीचे सदस्य बनवून देशाची घटना लिहिण्याची पूर्ण जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिली आणि त्या संविधानामुळे चहा विकणारा माणूस देशाचा प्रधानमंत्री झाला आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी भाईंदर येथे कोकण विभाग जिल्हा निहाय आढावा बैठकीत बोलतांना केलं. पटोले पुढे म्हणाले, काँग्रेसची परंपरा राहिलेली आहे की, ज्या काँग्रेसने संविधान बनवलं त्याच काँग्रेसने संविधान जोपासलं आहे. परंतु दहा वर्षापासून या देशाच्या प्रधानमंत्रीच्या पदावर बीजेपीचे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर संविधानाला रोज संपवण्याचं बाप ते लोक करत आहेत असा आरोप करत राहुल गांधीजी एकटे संविधान वाचविण्यासाठी लढत आहेत असे ठणकावून सांगितले. कुठल्याही परिस्थितीत संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही असा इशाराही दिला.
संविधानातल्या व्यवस्थेचा फायदा जनसामान्याला व्हावा यासाठी देशात जनगणना व्हावी ही ठामपणे भूमिका लोकसभेत राहुल गांधीजी मांडत आहेत हीच भिती बिजीपीच्या मनात आहे की, उद्या हा दबाव तयार झाला आणि जनगणना करावी लागली तर आमचं काय होणार, मूठभर लोकांचं काय होणार ही काळजी भाजपला सुरुवातीपासून सुरू झालेली आहे आणि म्हणून राहुल गांधीना धमकवण्याचे काम सुरू केलेलं आहे.ज्या लोकांनी राहुल गांधींना धमकवण्याचं काम केलेलं आहे त्या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी याचा खुलासा केला पाहिजे अशीही मागणी केली.
लोक त्यांना सत्तेच्या बाहेर घालवल्याशिवाय शांत बसणार नाही ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस सायलेन्स या दोन्ही ठिकाणी जिंकेल आणि ती भीती असल्यामुळे राहुल गांधीजीना टार्गेट करण्याचे काम भाजपचे लोक करत आहेत, त्याचा निषेध आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रात केलेला आहे. हे थांबलं नाही तर काँग्रेस आणि सामान्य जनता महाराष्ट्रामध्ये जेलभरो आंदोलन पुढच्या काळात करेल असा इशारा सुद्धा दिला आहे.
मीरा-भाईंदर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कोकण विभाग जिल्हा निहाय आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी रमेश चेन्निथला (अ.भा. कॉंग्रेस प्रभारी), बाळासाहेब थोरात (विधिमंडळ पक्षनेते), विजय वडेट्टीवार (विरोधी पक्षनेते), सतेज पाटील (विधीमंडळ गटनेते), चंद्रकांत हंडोरे (खासदार), भाई जगताप (काँग्रेस नेते), मुझफ्फर हुसैन (कार्यकारी अध्यक्ष) तसेच काँग्रेस पक्षाचे मीरा-भाईंदर, पालघर-विरार आणि कोकण विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.