भाईंदर (प्रतिनिधी): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेची मानली जाणारी ठाणे लोकसभेची जागा नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभेची श्रीकांत शिंदे यांनी जिंकून ठाणेचा गड शिवसेना शिंदे गटाने राखला आहे. ठाणे लोकसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडून मोठ्या संघर्षाने मिळवली होती. त्या नंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.
हि भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून महायुतीने नरेश म्हस्के यांचा जोरदार प्रचार करून विद्यमान खासदार आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा दारुण पराभव करून म्हस्के यांचा विजय झाला आहे. त्याचबरोबर कल्याण लोकसभेची जागा श्रीकांत शिंदे यांनी मोठ्या मतधिक्यानी विजय झाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव केला. त्यामुळे शिवसेनेचा पारंपरिक वर्चस्व असलेला गड मुख्यमंत्री शिंदे यांना राखण्यात यश आले आहे.