---Advertisement---

जिल्हास्तरीय शालेय “बॅडमिंटन” स्पर्धा उत्साहात संपन्न

By
On:
Follow Us

नवी मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे यांच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेचे आयोजन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.

ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन येथे संपन्न झालेल्या या बॅडमिंटन स्पर्धेत 14,17 आणि 19 वर्षाआतील विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतून पहिल्या दिवशी मुलांच्या गटात 67 संघ आणि दुस-या दिवशी मुलींच्या गटात 42 संघ असे एकुण 109 संघ सहभागी झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी स्पर्धेतील सहभागी संघात दुपटीने वाढ झालेली आहे.

या स्पर्धेचा शुभारंभ ऐरोली स्पोर्टस असोसिएशनचे सचिव डॉ.हेमंत अनार्थे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव, शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन समिती सदस्य श्री.धनंजय वनमाळी, ऐरोली स्पोर्टस असोसिएशनचे व्यवस्थापन समिती सदस्य श्री.प्रविण पैठणकर, श्री.संतोष राणे व बॅडमिंटन संघटनेचे पदाधिकारी व प्रमुख पंच श्री.शिवा करियाली अदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामना दिल्ली पब्लिक स्कुल, नेरुळ आणि युरो स्कूल, ऐरोली यांच्यात झाला. या अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात युरो स्कूल, ऐरोली शाळेच्या संघाने 2:1 अशा सेटनी सामना जिंकत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केली. या गटातील तिस-या क्रमांकासाठी पोद्दार सीबीएसई, नेरुळ आणि फा.ॲग्नल स्कूल, वाशी यामध्ये झालेल्या सामन्यात 2:1 अशा सेटने सामना जिंकत पोद्दार सीबीएसई स्कूल,नेरुळ शाळेच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला.

स्पर्धेमध्ये 17 वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामना डी.ए.व्ही.पब्लिक स्कूल, ऐरोली आणि दिल्ली पब्लिक स्कूल, नेरुळ यांच्यात झाला. यामध्ये डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल, ऐरोली शाळेच्या संघाने 2:1 अशा सेटनें सामना जिंकत विभागीय स्पर्धेत पात्रता निश्चित केली. या गटातील तिस-या क्रमांकासाठी सेंट झेवियर्स हायस्कूल, ऐरोली आणि एव्हालॉन हाईट स्कूल, वाशी यामध्ये झालेल्या सामन्यात 2:1 अशा सेटने सामना जिंकत सेंट झेवियर्स हायस्कूल, ऐरोली शाळेने तिसरा क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामना दिल्ली पब्लिक स्कूल, नेरुळ आणि एक.पी.जे.स्कूल, नेरुळ यांच्यात झाला. यामध्ये दिल्ली पब्लिक स्कूल, नेरुळ शाळेचा संघ 2:1 अशा सेटने विजयी झाला व विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. या गटातील तिस-या क्रमांकासाठी डॉन बॉस्को सेकंडरी स्कूल, नेरुळ आणि एस.आय.ई.एस. ज्यु.कॉलेज, नेरुळ यामध्ये झालेल्या सामन्यात 2:1 अशा सेटने डॉन बॉस्को सेकंडरी स्कूल, नेरुळ शाळेचा संघ तिस-या क्रमांकाचा मानकरी ठरला.

सदर स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम सामना युरो स्कूल, ऐरोली आणि एव्हालॉन हाईट स्कूल, वाशी यांच्यात झाला. या चुरशीच्या अंतिम सामन्यात युरो स्कूल, ऐरोली शाळेच्या संघाने 2:1 अशा सेटने सामना जिंकून विभागीय स्पर्धेत मुसंडी मारली. या गटातील तिस-या क्रमांकासाठी डी.ए.व्ही.पब्लिक स्कूल, नेरुळ यांनी ए.पी.जे स्कूल, नेरुळ यांच्यावर 2:1 अशा सेटने मात करीत तिसरा क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलींच्या गटात फा.ॲग्नल स्कूल, वाशी आणि सेंट मेरीज स्कूल, वाशी यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात फा.ॲग्नल स्कूल, वाशी शाळेच्या संघाने 2:1 अशा सेटने जिंकून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता संपादन केली. या गटातील तिस-या क्रमांकासाठी युरो स्कूल, ऐरोली आणि न्यू होरायझन स्कॉलर स्कुल, ऐरोली यामध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात 2:1 अशा सेटने युरो स्कूल, ऐरोली शाळेच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला.

19 वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम सामना दिल्ली पब्लिक स्कूल,नेरुळ आणि डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल,नेरुळ यांच्यात झाला. यामध्ये दिल्ली पब्लिक स्कूल,नेरुळ शाळेच्या संघाने 2:1 अशा सेटने सामना जिंकत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. या गटातील तिस-या क्रमांकासाठी ए.पी.जे. स्कूल, नेरुळ आणि नॉर्थ पॉईंट स्कुल, कोपरखैरणे यामध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात 2:1 अशा सेटनी सामना जिंकत ए.पी.जे.स्कुल, नेरुळ शाळेचा संघ तिस-या क्रमांकाचा मानकरी ठरला.

या स्पर्धा आयोजनासाठी महानगरपालिकेस ऐरोली स्पोर्टस असोसिएशन, ऐेरोली यांनी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देत स्पर्धा यशस्विरित्या पार पाडण्यासाठी बहुमोल सहकार्य केले.

यावर्षी स्पर्धेतील सहभागात लक्षणिय वाढ झाल्याने नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाकडून क्रीडा विकासासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसून आले. नवी मुंबई जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या संघांना पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Related News

Leave a Comment