भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक पंकज पांडे यांच्यावर गून्हा दाखल करण्याची मागणी
भाईंदर (प्रतिनिधी): मागील 15 वर्षांपासून भाईंदर पश्चिम गणेश देव नगर येथील रहिवाशी यांनी डॉ. भीम साहेब आंबेडकर सेवा सोसायटीची स्थापना करून स्थानिक नागरिकांनी गणेश देवल नगर क्रांतिनगर येथील फुटपाथ च्या कडेला नामफलक व निळा ध्वजही लावला होता, त्या अंतर्गत सामाजिक जनहितार्थ कामे केली जात असत. याठिकाणी राष्ट्रीय सण साजरे केले जात. स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिनाच्या दिवशी याच ठिकाणी ध्वजारोहन केले जात व इतर दिवशी निळा ध्वज लावलेला असायचा त्या ध्वजाजवळ भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक पंकज पांडे (दरोगा पांडे) यांनी पार्टीचे कार्यालय सूरू करत करत असून त्यासमोरच निळा ध्वज असल्याने त्यांना त्यांची अडचण होत होती त्यामुळे त्यांनी निळा ध्वज स्तंभ काढून टाकला असा आरोप स्थानिक आंबेडकरी समाज करत आहेत.
निळा ध्वज स्तंभ कडून टाकल्याचे निदर्शनात आल्यानंतर सर्व समाज एकत्र झाला आणि नंतर घडलेल्या प्रकारची तक्रार भाईंदर पश्चिम पोलिस ठाणे येथे वंचित बहुजन आघाडी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवा सोसाइटी च्या वतीने तक्रार कऱण्यात आली होती. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी चे माजी नगरसेवक पंकज पांडे हयांनी जय भीम नावाचा नीळा ध्वज हा फाडून टाकून ध्वजाचा पोल हा कपून फेकून दिला त्यांनी निळा जयभीम ध्वजचा अपमान केला आहे. तरी ह्या मुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. असेच प्रकार अनेक वेळा घडले असुन अनेक वेळा तक्रारी अर्ज देण्यात आले होते. मात्र करवाई झाली नाही तरी सदर इसम पंकज पांडे व त्याच्या सहकार्यने जय भीम नावाचा निळा ध्वज काढून टाकून विल्हेवाट लावून निळ्या ध्वजाचा अपमान करून आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या म्हणून अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारीत कऱण्यात आली होती. परंतु पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आरोपींवर लावकरात लवकर कारवाई करावी यासाठी सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भाईंदर पोलिस ठाणे च्या समोर अर्ध नग्न धरणे आंदोलनर करून रोष व्यक्त केले. सदर प्रकरणी अधिक तपास करून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन भाईंदर पश्चिम पोलिस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी आंदोलन कर्त्याना दिले.