---Advertisement---

मिरा भाईंदर मध्ये विविध विकास कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण सोहळा संपन्न

By
On:
Follow Us

भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील नागरिकांसाठी विविध कामांचा प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडला. घोडबंदर येथील संगणाई माता मंदिराजवळील छत्त्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याचे प्रत्यक्ष अनावरण केले तर घोडबंदर येथील घोडबंदर किल्ला, भाईंदर पूर्व येथील नवघर संगीत कारंजेतलाव, स्वर्गीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन, काशीगाव येथील जरिमरी संगीत कारंजेतलाव आणि निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह, E office, CSR conclave 24 अहवाल प्रकाशन, सोहळा मिरा भाईंदर मनपाने खास शहरातील नागरिकांसाठी तयार केलेली कमर्शिअल वेबसाईट आणि मिरा भाईंदर शहरातील बचत गटातील महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासाठी फराळ साथी लोगोचे अनावरणाचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण झाले. या सोहळ्याच्या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यानी मिरा भाईंदर महानगरपालिकेने केलेल्या कामाचे कौतुक केले. मिरा भाईंदर आता विकासाच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे इथे मेट्रोचे जाळे तयार होत आहेत, सिमेंटचे रस्ते होत आहेत अनेक विकास कामांना विशेष गती येत असल्याने मुंबई ठाण्या नंतर आता मिरा भाईंदर शहराचे नाव घ्यावे लागणार आहे एवढं शहर विकसित होत आहे असे प्रतिपादन केले.

मिरा भाईंदर महानगरपालिकेने केलेली विकास कामे याप्रमाणे मिरा भाईंदर क्षेत्रातील प्रशस्त असे स्वर्गीय हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन 46 हजार 700 चौरस मीटर एवढे क्षेत्रफळ असलेल्या जागेवर ही प्रशस्त इमारत उभी असून या इमारतीच्या तळमजल्यावर स्वागतकक्ष, कॉफी हाऊस, ग्रंथालय, 3 प्रदर्शन कक्ष, 175 आसन व्यवस्था असलेले सभागृह व होलोग्रम कक्ष असणार आहे तर पहिल्या मजल्यावर स्टुडिओ, मेमोरियल डिस्प्ले, बुक आणि ऑडियो लायब्ररी इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. सर्व सुविधांनी सुसज्ज असलेली ही वास्तू मिरा भाईंदर शहरातील नागरिकांसाठी लवकरच खुली करण्यात येणार आहे असे आश्वासही दिले.

भाईंदर (पूर्व) येथे आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह मोक्याच्या ठिकाणी असलेली प्रशस्त दोन मजली इमारत आज उभी असून तिच्या तळमजल्याच्या सभागृहाची ८०० आसन क्षमता तर पहिल्या मजल्या वरील सभागृहाची आसन क्षमता सुमारे 1000 इतकी आहे.

घोडबंदर किल्ला व त्याच्या परिसराचे जतन व संवर्धनाचे काम राज्य संरक्षित स्मारक योजने अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेने हाती घेतले होते. या मध्ये धान्याच्या कोठारांची डागडुजी, फरसबंदीची कामे, बुरुजाकडे जाणाऱ्या पायऱ्या, बुरुजाची तटबंदी, जिना, कमान, अंतर्गत खोल्या, पायऱ्या, विहीर यांची दुरुस्ती यासारखी अनेक कामे करण्यात येत आहेत.

मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील भाईंदर पूर्व येथील नवघर व काशिगीरा येथील जरिमरी तलावामध्ये म्युझिकल फाउंटन बसविणे व तलावाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. तलावामध्ये म्युझिकल फाउंटन वर 30.00 मीटर लांब व 9.00 मीटर उंचीचे वॉटर स्क्रिन उभारणे, नागरिकांना बसण्यासाठी अॅम्पी थिएटर उभारणे, तलावाच्या सभोवताली पाथवे बनविणे, रेलिंग लावणे, 3D पेंटिंग करणे, प्रोजेक्टर रुम बनविणे, लहान मुलांना खेळण्यासाठी सुविधा पुरविणे इत्यादी महत्वपूर्ण कागे या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर यांच्या या प्रयत्नांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री. एकनाथ शिंदे यांचे मोलाचं मार्गदर्शनाने फेब्रुवारी 2024 मध्ये ‘मिरा- भाईंदर@2047 conclave’ व याचेच पुढचे पाऊल म्हणून ऑगस्ट 2024 मध्ये CSR Conclave: transforming Mira Bhayander @2047 चे आयोजन करण्यात आले. नीती आयोगाच्या सहकायनि असे पाऊल उचलणारी मिरा भाईंदर महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगर पालिका ठरली आहे, आयआयटी बॉम्बे सारख्या नामांकित संस्थांशी भागीदारी करून पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्राच्या विकासावर भर देण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.

मिरा भाईंदर शहरातील सर्व नागरिकांसाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. आता MBMC Commercial Website द्वारे, घरबसल्या एका क्लिकवर महानगरपालिकेच्या सर्व सेवा आणि सुविधांची माहिती मिळणार आहे.लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्म अंतर्गत सिंगल विंडो प्रणालीद्वारे सर्व प्रशासकीय सेवा आणि सुविधांची सखोल माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. हि वेबसाईट महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही खूप महत्त्वपूर्ण ठरणार असून महिलांना त्यांनी तयार केलेल्या वस्तू आणि पदार्थांची विक्री करण्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि सशक्त करता येईल. तसेच घर खरेदीविषयी माहिती, नाट्यगृहे, सभागृहे, मैदाने, पे अँड पार्क यांसारख्या अनेक सुविधांची ऑनलाईन नोंदणी करणे सहज शक्य होईल. मिरा भाईंदर शहरातील सर्व इमारतींची सखोल माहिती या वेसाईटवर उपलब्ध झाली आहे. या नव्या डिजिटल उपक्रमाद्वारे सर्व नागरिकांना मनपाच्या उत्तम सेवा सुलभ आणि त्वरित देण्यासाठी कार्यरत आहे. १५ ऑगस्ट २०२३ आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ प्रसंगी, मिरा भाईंदर महानगरपालिकेने एक नवी दिशा दाखवणाऱ्या प्रवासाची सुरुवात केली. या दिवशी E office कार्यप्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. या उपक्रमाची दखल घेऊन केंद्र शासनाच्या एनआयसी विभागाने पत्र देऊन महानगरपालिकेला गौरविले आहे.

अशा विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याचा वेळी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समवेत मा. आमदार श्री. प्रताप सरनाईक (विधान सभा सदस्य) मा. आमदार श्री. रवींद्र फाटक (विधानसभा सदस्य), माननिय आमदार श्रीम. गीता जैन (विधानसभा सदस्य), पोलिस आयुक्त मधुकर पांडे अशी मान्यवर मंडळी उपस्थित होते. तर मिरा भाईंदर मनपा आयुक्त समवेत अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त संजय दोंदे (मुख्यालय), उपायुक्त सचिन बंगार, उपाआयुक्त श्रीम. कल्पिता पिंपळे, उपाआयुक्त प्रसाद शिंगटे तसेच मिरा भाईंदर महानगर पालिकेचे इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरा भाईंदर शहरातील नागरिकांसाठी लवकरच सुरू होत असलेल्या या विविध विकास कामांना समस्त मिरा भाईंदर वासियांनी नक्कीच भेट द्यावी अन असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Related News

Leave a Comment