---Advertisement---

जल जीवन मिशन कामांना गती मिळावी अन्यथा कारवाई करण्यात येईल – मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे

By
Last updated:
Follow Us

पुढील दोन महिन्यांत जल जीवन मिशनचे काम पुर्ण करण्याचे आदेश

जल जीवन मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेल्या कामांची प्रभावी अंमलबजावणी होऊन कामे जलद गतीने पुर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या अध्यक्षते खाली आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जल जीवन मिशन अंतर्गत एकुण ७२० कामे मंजुर असुन त्यापैकी १२८ योजनांची कामे पुर्ण झालेली आहेत. ५९२ योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. प्रगतीपथावर असलेल्या योजनांचा तपशिलवार आढावा घेण्यात आला.

जल जीवन मिशनच्या संबंधित ठेकेदारांना योजनांच्या कामांची गती तात्काळ वाढवुन कामे पुढील दोन महिन्यात पुर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. तसेच या बैठकीत ठेकेदारांना प्रत्यक्ष काम करत असताना उद्भवणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. या अडचणींवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले असून ही कामे विहीत मुदतीत पुर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारांवर कार्यवाही करण्यात येईल असे आढावा बैठकीत सांगितले गेले.

या बैठकीस कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी, उपकार्यकारी अभियंता चेतना पाटील, उपअभियंता शहापुर विकास जाधव, उपअभियंता भिवंडी प्रकाश सासे, उपअभियंता मुरबाड जगदीश बनकारी, उपअभियंता कल्याण आशिष कटरे, उपअभियंता अंबरनाथ अमित शिंदे, अभियंता ठाणे केतन चौधरी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार एन.जे.एस. व नाबार्ड अंभियंता तसेच ठेकेदार उपस्थित होत.

योग्य गुणवत्ता व दर्जा राखुन कामे करावीत याबाबत संबंधित ठेकेदार यांनी खबरदारी घ्यावी तसेच या कामांचे सनियंत्रण व मार्गदर्शन करणेकरीता राज्य स्तरावरून नेमण्यात आलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांचे अभियंता यांनी जल जीवन मिशनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करुन संबंधित ठेकेदार यांच्या मार्फत कामे करुन घ्यावीत अशा सुचना देखील देण्यात आल्या आहेत.

पाणी पुरवठा उपविभागातील अभियंता यांनी या कामांबाबत खबरदारी बाळगुन ठेकेदार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांच्यावर योग्य नियंत्रण ठेऊन कामे करावीत त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाव/पाड्यांतील ग्रामस्थांना पाण्याची कायम स्वरुपी व्यवस्था होणार असुन पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Related News

Leave a Comment