मुंबई : शाळांना मुख्याध्यापक नियुक्त करण्याबाबतच्या निवेदनावर शिक्षण आयुक्तांकडून प्राप्त अहवालानुसार सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
यासंदर्भात सदस्य जयंत आसगावकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, ज्या प्राथमिक शाळांची विद्यार्थी संख्या १५० व माध्यमिक शाळांची विद्यार्थी संख्या १०० होती, त्यांना मुख्याध्यापक पद पात्र होते. आता नियम बदलून प्राथमिक व माध्यमिक साठी १५० विद्यार्थी संख्येला मुख्याध्यापक पद पात्र हा नवीन नियम केला आहे. मात्र काही शाळांमध्ये फक्त आठवी, नववी व दहावीचे वर्ग असतात. त्यांना या निर्णयामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. याबाबत विविध निवेदन प्राप्त झाली आहेत. अशी सर्व निवेदन शिक्षण आयुक्तांकडे पाठवली आहेत. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.
या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सर्वश्री धीरज लिंगाडे, अरुण लाड, किरण सरनाईक यांनी सहभाग घेतला.