ठाणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत “मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रम” दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी मौजे बोरीवडे, घोडबंदर रोड, जि.ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी या कार्यक्रमासाठी येताना आपली वाहने खालील नमूद पार्किंग व्यवस्थेमध्ये पार्क करून या ठिकाणावरून मुख्य मंडप येथे पायी जायचे आहे.
नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत:-
कार पार्किंग C-4: आनंद नगर नाका पोलीस चौकीच्या बाजूला
कार पार्किंग C-5: आनंद नगर नाका सुन्नी जामा मस्जिदच्या बाजूस
कार पार्किंग C-6: बटाटा कंपनी डी मार्ट मॉलच्या बाजूला
कार पार्किंग C-7: हायपर सिटी मॉल पार्किंग
कार पार्किंग C-8: जीकॉर्प टेक पार्क कंपनीची पार्किंग हायपर सिटीच्या बाजूला
या कार्यक्रमास येणाऱ्या सर्व नागरिकांनी आपली वाहने वरील नमूद पार्किंग व्यवस्थेमध्ये पार्क करून या ठिकाणावरून मुख्य मंडप येथे पायी यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.