ठाणे : सैनिकी मुलांचे वसतीगृह, ठाणे व माजी सैनिक विश्रामगृह, ठाणे धर्मवीरनगर नौपाडा, ठाणे (पश्चिम), येथे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय कर्मचारी नेमणूक करण्यात येणार आहे, असे ठाणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
एकूण पद संख्या – 08
सहाय्यक वसतीगृह अधीक्षक (पुरुष – 1 पद) :- पात्रता/अटी – 1. माजी सैनिक, 2. एस.एस.सी. उत्तीर्ण, 3. MS-CIT व टायपिंग, 4. वयोमर्यादा- ४० ते ६०. दरमहा मानधन – 24 हजार 477/-. कामकाज स्वरूप व वेळ – अनिवासी (अधीक्षक गैरहजेरीमध्ये पूर्ण कार्यभार). शेरा – जेसीओ उमेदवारास प्राधान्य.
पहारेकरी (पुरुष – 2 पद) :- पात्रता/अटी – 1. माजी सैनिक/नागरी, 2. सातवी उत्तीर्ण, 3. वयोमर्यादा-3० ते 4०. दरमहा मानधन – 20 हजार 886/-. कामकाज स्वरूप व वेळ – निवासी ड्युटी. शेरा – वसतीगृह -1 व विश्रामगृह-1.
स्वयंपाकी (महिला – 3 पद) :- पात्रता/अटी – 1. स्वयंपाकात परिपूर्ण, 2. युध्द विधवेस/विधवेस प्राधान्य, 3. साक्षर. दरमहा मानधन – 13 हजार 924/-. कामकाज स्वरूप व वेळ – अनिवासी 8 तास/दिन 2 भाग सकाळ, संध्याकाळ. शेरा – हजेरी स.0615 व दु. 0330 वा.
सफाई कर्मचारी (पुरुष/महिला – 1 पद) :- पात्रता/अटी – 1. माजी सैनिक/नागरी, 2. सातवी उत्तीर्ण, 3.वयोमर्यादा-3० ते 4०. दरमहा मानधन –13 हजार 89/-. कामकाज स्वरूप व वेळ – अनिवासी 8तास/दिन. शेरा – वसतीगृह -1.
माळी (1 पद) :- पात्रता/अटी – 1. माजी सैनिक/नागरी, 2. सातवी उत्तीर्ण, 3.वयोमर्यादा-3० ते 4०. दरमहा मानधन – 13 हजार 89/-. कामकाज स्वरूप व वेळ – अनिवासी 8 तास/दिन. शेरा – सैनिकी आरामगृह -1.
या पदांसाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दि.28 जुलै 2024, मुलाखतीची तारीख – 30 जुलै 2024.
पत्रव्यवहाराचा पत्ता – १. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे, रु.नं.402, कोर्ट नाका ठाणे (प)-४००६०१, मो. 9920016580, 022-25343175
२. सैनिकी मुलांचे वसतीगृह, ठाणे धर्मवीरनगर, नौपाडा, ठाणे (प) ४००६०४, मो. 9769664830, 9246624105.
अटी व शर्ती –
१. या पदांवरील नियुक्ती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपातील, कंत्राटी पद्धतीने, अशासकीय संवर्गातील आहे.
२. अर्जासोबत युध्द विधवा/विधवा/माजी सैनिक/माजी सैनिक, आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र जोडावे.
३. शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
४. मुलाखातीवेळी उमेदवाराने वसतीगृह/विश्रामगृह कामास योग्य असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.
५. सैनिकी उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांस संधी देण्यात येईल.
६. निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचे अधिकार समितीकडे राखून ठेवण्यात आले आहेत.
तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ठाणे यांनी केले आहे.