---Advertisement---

मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर मतदार संघात एकूण 3 लाख 59 हजार 737 मतदारांची नोंदणी

By
Last updated:
Follow Us

नवी मुंबई, दि.13:- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय मतदारांची आतापर्यंतची एकूण 3 लाख 59 हजार 737 मतदारांची नोंदणी झाली अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली.

मुंबई पदवीधर मतदार संघात मुंबई शहर स्त्री 12 हजार 873 व पुरुष 17 हजार 969 तर तृतियपंथी 1, मुंबई उपनगर स्त्री 36 हजार 838 व पुरुष 52 हजार 987 तर तृतियपंथी 5 असे एकूण 1 लाख 20 हजार 673 मतदार आहेत.

मुंबई शिक्षक मुंबई शहर स्त्री 02 हजार 14 व पुरुष 511 तर तृतियपंथी 0, मुंबई उपनगर स्त्री 09 हजार 872 व पुरुष 03 हजार 442 तर तृतियपंथी 0 असे एकूण 15 हजार 839 मतदार आहेत.

कोकण विभाग पदवीधर मतदार संघात पालघर जिल्हा स्त्री 12 हजार 987 व पुरुष 15 हजार 930 तर तृतियपंथी 8, ठाणे जिल्हा स्त्री 42 हजार 478 व पुरुष 56 हजार 371 तर तृतियपंथी 11, रायगड जिल्हा स्त्री 23 हजार 356 व पुरुष 30 हजार 843 तर तृतियपंथी 9, रत्नागिरी जिल्हा स्त्री 09 हजार 228 व पुरुष 13 हजार 453 तर तृतियपंथी 0, सिंधुदुर्ग जिल्हा स्त्री 07 हजार 498 व पुरुष 11 हजार 053 तर तृतियपंथी 0, असे एकूण 2 लाख 23 हजार 225 नोंदणी होणाऱ्या पदवीधर मतदारांची संख्या आहेत.

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment