सामाजिक न्याय विभागाकडून समाजातील मागासवर्गीय घटकांसाठी विविध लाभदायक योजना राबविल्या जातात. अशा प्रकारे धनगर समाजासाठी देखील विविध योजना राबविल्या जातात.
१. भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळवून देणे.
२. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना सुरु करण्याबाबत.
३. केंद्र शासनाच्या स्टँडअप योजनेत भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या नवउद्योजक महिलांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देणे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीकरिता संबंधितांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे कार्यालय ४ था माळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दत्तवाडी, खारेगाव, कळवा ठाणे प. ४००६०५ या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण,ठाणे चे सहायक संचालक समाधान इंगळे यांनी केले आहे.