---Advertisement---

जिल्ह्यात प्रवेशोत्सव निमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत

By
Last updated:
Follow Us

भिवंडी: जिल्हा परिषद ठाणे, शिक्षण विभाग प्राथमिक मार्फत जिल्ह्यातील सर्व शाळा आज (दि. १५ जून २०२४ ) सुरू झाले असून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांनी शाळा भेट दिली आहे.

भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शाळा वैजोळा, केंद्र शिवनगर येथे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी भेट देऊन शाळा प्रवेशोत्सव साजरा केला. शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल, गोड पदार्थ, पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

शाळेतील पहिल्या दिवशी जसे सर्वांनी हजेरी लावली तसेच तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी वर्षभर शाळेत उपस्थित रहावे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले.

आज प्रवेशोत्सव निमित्ताने शासकीय शाळेत गावातील ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहात ही खरी आनंदाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत यावे यासाठी पालकांनी विशेष सहकार्य करावे. पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे. आहार आणि आरोग्य उत्तम राहिल्यास शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांना लागेल. जंक फूड न खाता विद्यार्थ्यांनी उत्तम आहार घ्यावा. शाळा छोटी असून देखील शाळेतील शिक्षक यमुना मिटकरी, अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ६० विद्यार्थीं या शाळेत शिक्षण घेत आहेत. आज शाळा सुरू होत असून शाळेतील नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यीं, पालक, शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी यांनी केले.

प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी शाळा भेट देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल अर्चना पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भिवंडी संजय असवले, जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा अनिल कुऱ्हाडे, शाळेचे शिक्षक यमुना मिटकरी, अर्चना पाटील, पालक, ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Related News

Leave a Comment